(वृत्त: चंपकमाला)
दीर्घ युगांच्या भेदक काळ्या
काजळ राती घोर निराशा
शोषित साऱ्या क्रुद्ध मनांची
दाहकतेने संतत झाली
उज्ज्वलतेची मोहक नांदी
देत उद्याच्या मुक्तपणाची
मानवतेच्या दुर्बलतेला
छेदत तेव्हा चाहुल आली
मात्र अखेरी निर्मळ स्वप्ने
केवळ सारी फोल ठरावी
हेच कपाळी जाणवताना
जीर्ण मनांनी काय करावे?
योग्यच ना हे पेटत जावे
बेदरकारी बाणत अंगी
फोडत जावे कातळ सारे
आणि नव्याने स्वप्न बघावे?
स्वस्थ जनांच्या दोन पिढ्यांनी
सोसत जावे त्यास्तव थोडे
यात पडावे काय कुणाला
नाहक मोठे निष्फळ कोडे?
- निलेश पंडित
२२ जून २०१४
दीर्घ युगांच्या भेदक काळ्या
काजळ राती घोर निराशा
शोषित साऱ्या क्रुद्ध मनांची
दाहकतेने संतत झाली
उज्ज्वलतेची मोहक नांदी
देत उद्याच्या मुक्तपणाची
मानवतेच्या दुर्बलतेला
छेदत तेव्हा चाहुल आली
मात्र अखेरी निर्मळ स्वप्ने
केवळ सारी फोल ठरावी
हेच कपाळी जाणवताना
जीर्ण मनांनी काय करावे?
योग्यच ना हे पेटत जावे
बेदरकारी बाणत अंगी
फोडत जावे कातळ सारे
आणि नव्याने स्वप्न बघावे?
स्वस्थ जनांच्या दोन पिढ्यांनी
सोसत जावे त्यास्तव थोडे
यात पडावे काय कुणाला
नाहक मोठे निष्फळ कोडे?
- निलेश पंडित
२२ जून २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा