कोपऱ्यात उभी कुणी
सकाळ पासून
डोळ्यांमध्ये कमालीची
उत्कंठा दाटून
नेसलेली स्वस्तातली
साडी नवीकोरी
प्रशस्तीपत्रके हाती
मात्र गोरीमोरी
नजरेची भिरभिर
पदराचा चाळा
छातीमध्ये धडधड
ओकाबोका गळा
आत्यंतिक अस्वस्थता
कपाळाला आठी
वाट बघते रांगेत
मुलाखती साठी
न्याहाळीत संभावित
करी मनी बेत
काळ्या गाभ्यावर वसे
स्वच्छ शुभ्र श्वेत
केविलवाणासा वाटे
फोटोतला देव
मनोमन शरीरांची
पाही उठाठेव
- निलेश पंडित
३ जून २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा