हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३ जुलै, २०१४

एक रात्र

(वृत्त: जीवनलहरी)

भवताली गर्दी पण
जीव एकएकटेच
कालचक्र तेच तेच
धगधगणे रोजचेच

डोळ्यांशी डोळ्यांची
भेट घडे अकस्मात
दोन मनांचा घडतो
मूकतेत कुजबुजाट

वाढत वय जाताना
अतृप्ती धारदार
आकर्षण इकडे तर
तिकडे कर्तव्यभार

नव्या युगी नवे प्रश्न
तेच देह तेच मोह
बंडखोर गरजांचा
तात्पुरता उहापोह

घेई अंती कवेत
अंधारी एक रात्र
निजती मग शांततेत
दोन जीव गात्र गात्र


- निलेश पंडित
३ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा