हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ४ जुलै, २०१४

काय

(वृत्त: मनोरमा)

काल होते बोलबाले
आज त्यांचे काय झाले

सूर्य ज्यांना समजलो ते
काजवे फसवे निघाले

रामप्रहरी आत्मशुद्धी
रात्रभर भरतात प्याले

पूजिले मी पाय तेव्हा
काय हे पदरात आले

मानली ज्यांनी अहिंसा
नित्य ते रक्तात न्हाले

रुंद छाती शूर बाणा
जीव घेउन का पळाले

लाभले स्वातंत्र्य तेव्हा
काय आम्हाला मिळाले


- निलेश पंडित
४ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा