हा ब्लॉग शोधा

शनिवार, ५ जुलै, २०१४

दीन


ते सर्व
टाकतात
मला संभ्रमात
जे अहोरात्र झटण्यासाठी
केव्हातरी कशासाठी
कोणत्यातरी दीनांसाठी
निघतात सूर्याकडे
फिरवून पाठ
मोडणारी पण न वाकणारी
मान ठेवून ताठ
पेरण्यास काजवे अंधारात
एकएकटे रहात
नव्या युगाची
एखाद्या रंगाला वाहिलेली
वा रंगहीन
सुती वस्त्रं
घामटशा अंगावर आणि
त्याहूनही ओशट घामट
मनोवृत्तीवर चढवून
जगतात
खिशात खुळखुळणाऱ्या
पैशाच्या किंवा
तथाकथित त्यागाच्या
… कैफात
आणि भासतात
दुबळे … दीन


- निलेश पंडित
६ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा