हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

घाम


थेंब नेमका तसाच पण तो
कुणी गाळतो कुणी टाळतो
सदैव टाळत जाणारा वर
गाळत जाणाऱ्यास पाळतो

गाळे त्याला फुटे अशी ही
घामाची ह्या बातच न्यारी
वातानुकुलित वातावरणी
स्वास्थ्य सुखाने करी चाकरी

घामाने लिबलिबून शरिरे
गजबजती मग भक्तीपेठी
गळ्याभोवती तिथे नेमक्या
पडती फासाच्या निरगाठी

रक्ताचे करुनी पाणी जे
नित्य क्रमाने घाम गाळती
एकदिलाने पालक गाती
त्यांच्या पुण्याईची महती

मूल्य जाणुनी श्रमशक्तीचे
पिढ्या अशा जगतील पुढेही
घामेजुन बघतील मरणही
याची डोळा याची देही

- निलेश पंडित
३१ ऑगस्ट २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा