हा ब्लॉग शोधा

सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

सावली

लख्ख प्रकाशात
उजळ माथ्याने वावरणा-या
तजेलदार ताज्या देहाला
असतात धरून
काही सावल्या
काही किंकाळ्या उरात दाबून
आणि असतात काही
ज्यांना असतो कवटाळून
तो देह
जरब आणि दहशतीचा
स्वत: आधार घेत ....

.... ही रीत कळेपर्यंत
मी ही झाले एक सावली
तेव्हा माझ्या नकळत
कधीच झाला होता
अवतीभवतीचा प्रकाश
मिणमिणता ... अंधुक
आणि देह
शिळा ... जर्जर
टिकत नाही
ज्याची सावलीही फार काळ


- निलेश पंडित
४ आॅगस्ट २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा