हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०१४

वादळ

(वृत्त: व्योमगंगा)

मध्यरात्री वेदनेला शांततेचा स्पर्श झाला
देह उरला आणि आत्मा शरण गेला वादळाला

सूर जुळले ताल जुळले मुक्त झंकारून तारा
रंगल्या रात्रीत खुलल्या रागिण्यांच्या कैक माला

भोवताली पौर्णिमेचे चांदणे होते विखुरले
रोमरोमी त्यात थंडीने फुलवल्या लक्ष ज्वाला

वादळे ना थांबता गेली तशी परतून आली
परतुनी ताज्या दमाने मात्र ती भिडली शिडाला

वाट चुकले मन तसे देहास गेले शरण जेव्हा
संयमाचा ग्रंथ तेव्हा राहिला केवळ उशाला


- निलेश पंडित
१८ सप्टेंबर २०१४
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा