हा ब्लॉग शोधा

शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

इतिहास


प्रत्येक संस्कृतीचा इतिहास थोर आहे
जो आठवून कोणी नेता मुजोर आहे

गावी नशेत गाणी प्राचीन वैभवाची
विसरून काळ आता खडतर समोर आहे

साधीच राहणी अन् उत्तम विचार ज्याचे
बाहेर त्यागमूर्ती तो आत चोर आहे

दिसता कुणी महात्मा लक्षात हे असू द्या
भाषा भले मृदू पण वृत्ती कठोर आहे

जिंके सदैव येथे कृतिशून्यतेतही तो
पोकळ असून ज्याच्या भाषेत जोर आहे

 

- निलेश पंडित
१४ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा