(वृत्त: हरिभगिनी)
प्राजक्ताचा कधी सडा पाचोळा केवळ कधी पडे
कधी चिमुकल्या बागडत्या पायांची मुबलक फैर झडे
ऊन रणरणे सर्वांगाला चटके देई क्रूरपणे
त्वचा तडतडे भेगा पडती अन् अवघड होई जगणे
जलधारा येती सरसर भिजविती चिंब अंगांगाला
तेव्हा तृप्ती देई चाहुल अर्थ लाभतो जगण्याला
कुणी कधी मोहक रांगोळी प्रेमाने घाली जेव्हा
वात्सल्याने आनंदाने अवचित ऊर भरे तेव्हा
तुळशी वृंदावन मध्यावर अन् पणत्या अवतीभवती
कोपऱ्यात अन् कुठे कडेला मुंग्या उंदिर पोखरती
सुखदुःखाच्या मिश्रणात ह्या जगणे घडते अन् सजते
घरामाणसांच्या जोडीने उघड्यावर अंगण रुजते
- निलेश पंडित
२४ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा