जेव्हा समजलं
एका आघातात तडा गेलेली
किंवा फुटलेली काच,
काळ्या पाण्याला काळंशार करणाऱ्या
काळ्याकुट्ट कातळाच्या भिंती,
कुठे सदैव अभिषिक्त
तर कुठे सदैव शेंदराने माखलेल्या
युगानुयुगे तशाच उभ्या मूर्ती
काही दीर्घजीवी
तर काही अल्पजीवी
बांधकामं
आणि मैलामैलावर
फक्त बदलणारे आकडे
या सर्वांचा पायाभूत
महत्तम साधारण विभाजक
तोच असतो
तेव्हा जाणवली सार्थकता
दडलेली
हृदयावर दगड ठेवण्यात
- निलेश पंडित
१८ ऑक्टोबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा