(वृत्त: लवंगलता)
रविवारी ती भल्या सकाळी दुडुदुडु धावत येते
गोड हासते, खळखळते अन् कौतुक करून घेते
दोन गोबऱ्या गालांवरती दोन खळ्यांची खेळी
गालावरती पापी देते हातावरती टाळी
कधी दाखवे हातावरची भलीथोरली मेंदी
कधी कपाळावरती मोठी चमचमणारी बिंदी
मग ती घेते ताबा माझा माझ्या खोलीचाही
क्षणांत काजू बेदाणे सापडते सारे काही
"गम्मत थाले मध्ली थगलि" ऐकवते नंतर ती
अवचित माझ्या आयुष्यावर रंग उषेचे चढती
आठवडा नंतर पुरता ह्या शेजारावर जगतो
टाळण्यास धडपडतो पण मी अंतरात तगमगतो
गौतम-जेनीची साराही अशीच आहे आता
कशास पृथ्वी विशाल केली मैलोमैल अनंता !
- निलेश पंडित
१९ ऑक्टोबर २०१४
रविवारी ती भल्या सकाळी दुडुदुडु धावत येते
गोड हासते, खळखळते अन् कौतुक करून घेते
दोन गोबऱ्या गालांवरती दोन खळ्यांची खेळी
गालावरती पापी देते हातावरती टाळी
कधी दाखवे हातावरची भलीथोरली मेंदी
कधी कपाळावरती मोठी चमचमणारी बिंदी
मग ती घेते ताबा माझा माझ्या खोलीचाही
क्षणांत काजू बेदाणे सापडते सारे काही
"गम्मत थाले मध्ली थगलि" ऐकवते नंतर ती
अवचित माझ्या आयुष्यावर रंग उषेचे चढती
आठवडा नंतर पुरता ह्या शेजारावर जगतो
टाळण्यास धडपडतो पण मी अंतरात तगमगतो
गौतम-जेनीची साराही अशीच आहे आता
कशास पृथ्वी विशाल केली मैलोमैल अनंता !
- निलेश पंडित
१९ ऑक्टोबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा