(वृत्त: कालगंगा)
बोलती डोळे तिचे ओठांत मुरते शांतता
मी जरा जातो जवळ तेव्हा बिथरते शांतता
बोलती डोळे तिचे ओठांत मुरते शांतता
मी जरा जातो जवळ तेव्हा बिथरते शांतता
संपते ऊर्जा ध्वनीची सूर्यकिरणे लोपती
मात्र उरल्या उष्णतेची साथ करते शांतता
मंद थोडेसे उसासे ज्योत जळते एकटी
एकटी जळते नि विझते अन् पसरते शांतता
शब्दही संपून जाती दृश्य सारे संपते
किर्र काळोखात तेव्हा फक्त झरते शांतता
उष्ण थोडे श्वास काही हालचाली थोडक्या
थोडके जगण्यात बाकी मात्र उरते शांतता
- निलेश पंडित
२१ आॅक्टोबर २०१४
मात्र उरल्या उष्णतेची साथ करते शांतता
मंद थोडेसे उसासे ज्योत जळते एकटी
एकटी जळते नि विझते अन् पसरते शांतता
शब्दही संपून जाती दृश्य सारे संपते
किर्र काळोखात तेव्हा फक्त झरते शांतता
उष्ण थोडे श्वास काही हालचाली थोडक्या
थोडके जगण्यात बाकी मात्र उरते शांतता
- निलेश पंडित
२१ आॅक्टोबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा