हा ब्लॉग शोधा

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

रांग

(वृत्त: लवंगलता)

मुंबईत ना केवळ अवघ्या जगी पांगली आहे
अजून मर्ढेकर मुंग्यांची रांग लागली आहे

तशीच येते अजून लोकल गाडी दहादहाची
तशीच दारावर श्वासांनी जान टांगली आहे

जमू लागले आहे आपत्तीच्या मुळ्या उकळणे
त्यांवर स्वप्ने विकणाऱ्यांची स्थिती चांगली आहे

आता ना उरलेला कोणी आहे इथे फिरंगी
शासन करण्याची त्यांचीही हौस भागली आहे

जुना वारसा टिकवावा ही परंपरा थोरांची
परकीयांसम सत्तेमधली पिढी वागली आहे

प्रसन्न चतुरा अनेक आता जागोजागी वसती
एका सम्राज्ञीची तुमची पिढी मागली आहे

कोण म्हणे चुकला आहे येथे जगण्याचा पाढा
कथली वाळ्याच्या नावाला प्रजा जागली आहे


- निलेश पंडित
१९ ऑक्टोबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा