हा ब्लॉग शोधा

बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

खात्री

(वृत्त: कालगंगा)

नाव दे काही इतर ह्याला म्हणू मैत्री कसे 
तू नि मी एकांत पाहुन भेटतो रात्री कसे

आपल्या नशिबात अंतर स्पर्श ना क्षणभर कधी
सांग मग आवाज ऐकुन भारतो गात्री कसे

भेटता दोघे न आपण काळही थांबे जिथे
चालती एकेकटे सारे जगी यात्री कसे

चिंब ओलेती तुला मी पाहणे जर भावते
सांग वेडे वापरू आपण कधी छत्री कसे

बिलगलीसच सांगताना 'जा मला विसरून तू'
सांग मग देईल मन माझे तुला खात्री कसे


- निलेश पंडित
२९ ऑक्टोबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा