(मणि मोहन मेहता यांच्या "दो मिनिट का मौन" या कवितेचा स्वैर भावानुवाद )
(वृत्त: भूपति)
ती महाभयंकर काय यातना असते
जी मौनाला ग्रासून आत ठसठसते ...
क्षणभरात घुसमट करते अस्तित्वाची
शांतता जणू वणव्यासम आत धुमसते?
मौनाशी माझे वैर एरवी नाही
वक्तव्य कुणाचे ऐकत बसतो काही
मी शांत राहतो तेव्हा तासन् तास
मग असो कथा वा .... केवळ घोर व्यथाही
संगीत कधी वा कानावरती पडता
समजो वा ना समजो मज नसते चिंता
अथवा मी धडधड कुठल्याशा ह्रदयाची
मौनात ऐकतो सहजच येता जाता
एकाच प्रसंगी मी अवघा डळमळतो
मौनाच्या अंताचा कानोसा घेतो
शांततेत मिनिटे दोनच शोकसभेची
सरताना क्षणक्षण युगायुगांचा होतो
मन सैरभैर .... दिसतो काही न उपाय
ढळणारा तोल नि अवघडलेले पाय
मी हतबल, अगतिक, हिरमुसलेला असता
प्रार्थना करावी कशी, कुणाची, काय .... ?
- निलेश पंडित
१३ नोव्हेंबर २०१४
(वृत्त: भूपति)
ती महाभयंकर काय यातना असते
जी मौनाला ग्रासून आत ठसठसते ...
क्षणभरात घुसमट करते अस्तित्वाची
शांतता जणू वणव्यासम आत धुमसते?
मौनाशी माझे वैर एरवी नाही
वक्तव्य कुणाचे ऐकत बसतो काही
मी शांत राहतो तेव्हा तासन् तास
मग असो कथा वा .... केवळ घोर व्यथाही
संगीत कधी वा कानावरती पडता
समजो वा ना समजो मज नसते चिंता
अथवा मी धडधड कुठल्याशा ह्रदयाची
मौनात ऐकतो सहजच येता जाता
एकाच प्रसंगी मी अवघा डळमळतो
मौनाच्या अंताचा कानोसा घेतो
शांततेत मिनिटे दोनच शोकसभेची
सरताना क्षणक्षण युगायुगांचा होतो
मन सैरभैर .... दिसतो काही न उपाय
ढळणारा तोल नि अवघडलेले पाय
मी हतबल, अगतिक, हिरमुसलेला असता
प्रार्थना करावी कशी, कुणाची, काय .... ?
- निलेश पंडित
१३ नोव्हेंबर २०१४
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा