(वृत्त: सुमंदारमाला)
मनाच्या तळाशी वसे गूढ भीती
विचारांस जी नेहमी ग्रासते
रुजे अंधविश्वास तेव्हा स्वभावे
मनाला अतार्कीकता फासते
जरी अज्ञता
जाचते मानवाला
तरी मूढता
अंगिकारू कसा
भले अज्ञ
मी मात्र पूजून
कोणा
खुळी अंधता
मी स्विकारू कसा
चला अंतराळात घेऊ भरारी
मनाचे चला पाश तोडू जरा
व्यथा अन कळा अंतरी सोसताना
सदा चेहरा ठेवुया हासरा
दिसे जेथ
अज्ञात तेथे चिकित्सा
असा मंत्र
जे नित्य चोखाळती
तयांनीच विज्ञान केले
प्रवाही
दिली मानवाला
तयांनी गती
बघू काय होते …. जगू आणि पाहू
प्रयोगात सर्वस्व शोधू चला
जसे आकळे ते तसे सर्व मांडू
वृथा भक्तिची तोडुया शृंखला
- निलेश पंडित
२१ नोव्हेंबर
२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा