(वृत्त: मंजुघोषा)
अंतरे थकली जशी मापून अंतर
वाढले दोघांतले आतून अंतर
वाट बघणे वाटते कंटाळवाणे
सोड हा रुसवा सखे जाणून अंतर
रागलोभाला मिळाली मूठमाती
वेगळे असते कुठे ह्याहून अंतर
एकमेकांच्या सवेही एकटे ते
राहिले जे नेहमी टाळून अंतर
संपला रस्ता तरी ना भेट झाली
का कधी मिटते असे कापून अंतर
ती सदा नादावलेली स्वप्नवेडी
नेहमी तो ठेवतो आखून अंतर
एकमेका गाठण्याला धावताना
का दुरावा वाढला चालून अंतर
देह देहाला जरी भेटे तरीही
भेटतो ह्रदयांमधे राखून अंतर
अंतरे थकली जशी मापून अंतर
वाढले दोघांतले आतून अंतर
वाट बघणे वाटते कंटाळवाणे
सोड हा रुसवा सखे जाणून अंतर
रागलोभाला मिळाली मूठमाती
वेगळे असते कुठे ह्याहून अंतर
एकमेकांच्या सवेही एकटे ते
राहिले जे नेहमी टाळून अंतर
संपला रस्ता तरी ना भेट झाली
का कधी मिटते असे कापून अंतर
ती सदा नादावलेली स्वप्नवेडी
नेहमी तो ठेवतो आखून अंतर
एकमेका गाठण्याला धावताना
का दुरावा वाढला चालून अंतर
देह देहाला जरी भेटे तरीही
भेटतो ह्रदयांमधे राखून अंतर
- निलेश पंडित
१० नोव्हेंबर २०१४
१० नोव्हेंबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा