विचारांचे माजले काहूर
भावनांचा डोळ्यांमधे पूर
कोप-यात आक्रंदते बाळ
रिते पोट फाटलेला ऊर
फक्त दोन जीव खोपटात
तिस-याचा संपून फासात
भविष्यात भकास पोकळी
अंधाराचा वारसा पुढ्यात
आता खुणावती दोन दिशा
निराशा आणि अंताची आशा
फास तोच मोकळा परंतू
देत सर्वस्वाची अभिलाषा
तज्ज्ञांचा खल समस्येवर
संपत्ती खर्चून भारंभार
शक्ती भक्ती युक्तीवर श्रम
कृतीशून्य सखोल विचार
एकतत्वी बंदिस्त उणीव
सर्वांत भिन्नतेची जाणीव
मरती दोन ह्या पिढीतले
पुढे शोक वाहे दुजा जीव
- निलेश पंडित
२५ डिसेंबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा