हा ब्लॉग शोधा

रविवार, २८ डिसेंबर, २०१४

अश्मयुग

मोहावर मोह । मोहाखाली मोह 
मोहाचाच डोह । खोल खोल ।। 
 
मोहाचे वास्तव्य । सदैव अंतरी 
मात्र मुखावरी । संन्यस्तत्व ।। 
 
तर्क अनुमान । असा शुद्ध आव 
अंतरात भाव । अहंतेचा ।। 
 
स्वत्वाचा मुलामा । आत अहंकार 
त्यागाला किनार । धूर्ततेची ।। 
 
सोयिस्कर तेव्हा । मानव्याची मूल्ये 
 ह्रदयात शल्ये । अतृप्तीची ।। 
 
 सभ्यतेचा वेष । जणू कुणी घाले 
आत दडलेले । जनावर ।। 
 
अशी खरोखर । संस्कृती प्राचीन 
 पोटी बाळगून । अश्मयुग ।। 
 
- निलेश पंडित 
२८ डिसेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा