हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

नि:शब्द



मेहनतीने
शब्दशब्द जुळवून
रचलेल्या
वाक्यातून झरतो अर्थ
तेव्हा त्याच वाक्यात
असते - दिसते
अव्यक्त दृश्य पोकळी
अक्षरश: प्रत्येक शब्दामागेपुढे
लगडलेली
जी कळत नाही
जी टळत नाही

हे अनुभवूनही
न बदलणारा मी
तेच शब्द
कवितेत पेरून
शोधत राहतो
अर्थ पोकळीचा
तेव्हा नकळत सुखावतो
स्पर्शाने
अनंत नि:शब्दाच्या


- निलेश पंडित
३० जानेवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा