(वृत्त: कालगंगा)
भूतकाळातील दुःखाची भयंकर सावली
ग्रासुनी भवितव्य आयुष्यात का घोंगावली
पाठ मी सूर्याकडे फिरवून थोडा चालता
कृष्णछाया नेहमी माझ्यापुढे झेपावली
सूर्य माध्यान्ही तळपता भाजली सारी त्वचा
खुद्द माझी सावली लपण्यास तेव्हा धावली
सावली होती खरी जी राहिली माझीच ती
मी जरा संथावता तीही जरा संथावली
चालताना मी जिला दुर्लक्षिले ती शेवटी
किर्र अंधारात माझी सावली सामावली
- निलेश पंडित
१ फेब्रुवारी २०१५
भूतकाळातील दुःखाची भयंकर सावली
ग्रासुनी भवितव्य आयुष्यात का घोंगावली
पाठ मी सूर्याकडे फिरवून थोडा चालता
कृष्णछाया नेहमी माझ्यापुढे झेपावली
सूर्य माध्यान्ही तळपता भाजली सारी त्वचा
खुद्द माझी सावली लपण्यास तेव्हा धावली
सावली होती खरी जी राहिली माझीच ती
मी जरा संथावता तीही जरा संथावली
चालताना मी जिला दुर्लक्षिले ती शेवटी
किर्र अंधारात माझी सावली सामावली
- निलेश पंडित
१ फेब्रुवारी २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा