(वृत्त: कालगंगा)
राखण्या शांती म्हणे गीता जगाला लागते
फक्त थोडीशी नशा माझ्या जिवाला लागते
कैकदा वाचून ओव्या पाठ ना होती कधी
सुस्वरांची नेहमी मात्रा मनाला लागते
सर्व काही त्यागुनी संन्यास आम्ही घेतला
मात्र रक्कम देणगीची आश्रमाला लागते
लोकशाही लोकसत्ता लाभता स्वातंत्र्यही
का विषाची चव अचानक अमृताला लागते
लपवुनी सारे गुन्हे मरता कधी नेते कुणी
आग सारी नेहमी का चंदनाला लागते
(एक वेगळा शेर)
पाहिल्याने एकदा तुजला उन्हाने तापत्या
सावलीची ओढ आता रोज त्याला लागते
- निलेश पंडित
६ मार्च २०१५
राखण्या शांती म्हणे गीता जगाला लागते
फक्त थोडीशी नशा माझ्या जिवाला लागते
कैकदा वाचून ओव्या पाठ ना होती कधी
सुस्वरांची नेहमी मात्रा मनाला लागते
सर्व काही त्यागुनी संन्यास आम्ही घेतला
मात्र रक्कम देणगीची आश्रमाला लागते
लोकशाही लोकसत्ता लाभता स्वातंत्र्यही
का विषाची चव अचानक अमृताला लागते
लपवुनी सारे गुन्हे मरता कधी नेते कुणी
आग सारी नेहमी का चंदनाला लागते
(एक वेगळा शेर)
पाहिल्याने एकदा तुजला उन्हाने तापत्या
सावलीची ओढ आता रोज त्याला लागते
- निलेश पंडित
६ मार्च २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा