टवटवीतशा वाटणाऱ्या
पानांमधून
फुलाफळांमधून
वहात असलेला
संतत फवारणीतून
थोडाफार पेरणीतूनही
जन्मलेला
मदतकारक पण विषारी रसायनांच्या
अतिरेकी वापरामुळे
आयुष्यभर … आणि नंतरही …
नशिबाला जडलेला
दूषित अंतःप्रवाह
करतो चिरंतन नुकसान
ती पानं फुलं फळं भक्षणाऱ्या
निष्पाप आईच्या
वात्सल्यावर जोपासलेल्या
एकाच नव्हे
तर येणाऱ्या
अनेक पिढ्यांचंही
Epigenetics लागू पडेल
अशा क्षेत्रांना आणि शक्यतांना
थोडी मर्यादा असेलच
ह्या आशावादावर मी जगतो
मात्र ही आशा
पूर्वजांची देणगीच बहुतेक
…. की शाप?
- निलेश पंडित
२३ मे २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा