हा ब्लॉग शोधा

शनिवार, ६ जून, २०१५

चेहरा


(वृत्त: कालगंगा)

आज दिसतो फक्त तेथे श्वापदाचा चेहरा
रोज मी जेथे बघावा माणसाचा चेहरा

ते म्हणाले नष्ट आम्ही करवितो सारे गुन्हे
बदलला त्यांनी अचानक मग गुन्ह्याचा चेहरा

तळपला सूर्याप्रमाणे क्रांतिकारी जो कधी
आज तसबीरीत उरला फक्त त्याचा चेहरा

शेलकी आश्वासने नंतर कृती पण वेगळी
कळत नाही हा कुणाचा तो कुणाचा चेहरा

कालच्या मारेकऱ्यांना का पडावा प्रश्न हा
का अचानक बिघडला आहे जगाचा चेहरा


- निलेश पंडित
७ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा