(वृत्त: स्रग्धरा)
साधीभोळीच कोणी तळमळत असे त्रस्त होऊन जेव्हा
लाखो आठ्या कपाळी थरथर शरिरी होय अस्वस्थ तेव्हा
सर्वांगी घर्मबिंदू भिजवित वसने जाचती आर्द्रतेने
चिंता साचे मनी जी सुखकर जगणे नासवी सुप्ततेने
विश्वाची कृष्णछाया सतत कुठुनशी ग्रासताना मनाला
भीती दाटे उरी अन् धडधड हृदयी पाहताना जगाला
स्वप्नांचे विश्व काळे अजब छळ मनी मांडते जीवघेणा
पैलू पैलू मनाचा अचपळ बनुनी होतसे दैन्यवाणा
कोणी येता समोरी लगबग करुनी योजिते योग्य सेवा
खोटे हासोनि दावी सल भय लपवी देतसे ना सुगावा
सर्वांशी आदबीने थबकत जपुनी बोलते नम्रतेने
शब्दाशब्दात पेरी सहज सुवचने आणि काही उखाणे
ऐशा पाहून स्त्रीला पुरुष म्हणतसे "हीच माझी पसंती
आहे साध्वी सुशीला …. अगतिक जगते … आणि मी स्वैर अंती"
- निलेश पंडित
२० जून २०१५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा