हा ब्लॉग शोधा

बुधवार, ८ जुलै, २०१५

विश्वास

Heinrich Heine ह्या जर्मन कवीच्या Ich Glaub Nicht An Den Himmel (I don't believe in heaven) ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद:

(वृत्त: भूपति)

जे वर्णन स्वर्गाचे वेदांनी केले
विश्वास कधी ना त्यावर माझा बसला
दिव्यत्व तुझ्या डोळ्यांत पाहिले मी अन्
त्या क्षणी स्वर्ग तेथे माझा अवतरला

देवास वर्णिले श्रुती स्मृती संतांनी
ना पटले वा उमजले कधी ते काही
ह्रदयाची जेव्हा ऊब तुझ्या अनुभवली
कळले तिजवाचुन देव वेगळा नाही

सैतान ना कधी नरक कधी ना कळला
ना करणी ना काळी जादू मज कळली
जाणतो परी मी विषवल्ली जन्मेल
जर सूडभावना मनी तुझ्या सळसळली

कल्पनाविलासासम जे ऐकत गेलो
निष्फळ ते सारे ... त्या गोष्टी ... ती गाणी
नेत्रांत तुझ्या .... ह्रदयात तुझ्या रस सारे
मध, मद्य, सुधारस, विष, अमृत वा पाणी


- निलेश पंडित
८ जुलै २०१५

__________________________________

मूळ कविता:

I don’t believe in Heaven,
Whose peace the preacher cites:
I only trust your eyes now,
They’re my heavenly lights.

I don’t believe in God above,
Who gets the preacher’s nod:
I only trust your heart now,
And have no other god.

I don’t believe in Devils,
In hell or hell’s black art:
I only trust your eyes now,
And your devil’s heart.


Heinrich Heine

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा