माणसे सामान्य । माझ्यासारखीच
कोडी आगळीच । घालतात ।।
नसे अपवाद । माझाही तयांत
एकच जमात । सामान्यांची ।।
साधेसुधे सुख । सुखासुखी येता
न ये त्याची चिंता । करतात ।।
नवी यंत्रे तंत्रे । वापरती जरी
जुन्यासाठी तरी । शोकमग्न ।।
आधुनिकतेच्या । स्पर्शात जगती
मात्र प्रशंसती । प्राचीनता ।।
अभिनंदनाचा । शब्द प्राप्त होता
घोर रडकथा । रंगविती ।।
कष्ट कसे केव्हा । माथी आले त्यांच्या
गोष्टी सा-या त्याच्या । ऐकविती ।।
दिसे कोणी जेव्हा । आनंदी नेहमी
"अधिक सुखी मी" । सांगतात ।।
किंवा "अशी संधी ... । ... नव्हती आम्हांस"
म्हणुनी उदास । होत जाती ।।
वेगळेपणाचा । संतत हव्यास
जोखीम तयांस । मात्र नको ।।
तर्कशुद्धतेच्या । आभासी जगती
मनी जोपासती । आशावाद ।।
निराधार आशा । डोळ्यांस झापडे
ह्यांत त्यां सापडे । समाधान ।।
पडता ही कोडी । प्रश्न माझा मीच
मनास माझ्याच । विचारला ।।
स्वबलावाचून । काय वेळी अशा
जगण्यास दिशा । पुरवी जे ।।
कृतीशील जो जो । मध्यमवर्गीय
तयापाशी काय । आशेविना ।।
स्वत:चे स्वत:च । जिणे अंतर्बाह्य
सदैव सुसह्य । करतात ।।
प्रार्थनेने माझ्या । मलाच स्फुरण
आशेचे तोरण । तसे मना ।।
कधी न सुटावी । अशी काही कोडी
राहू द्यावी थोडी । आयुष्यात ।।
- निलेश पंडित
१२ जुलै २०१५
कोडी आगळीच । घालतात ।।
नसे अपवाद । माझाही तयांत
एकच जमात । सामान्यांची ।।
साधेसुधे सुख । सुखासुखी येता
न ये त्याची चिंता । करतात ।।
नवी यंत्रे तंत्रे । वापरती जरी
जुन्यासाठी तरी । शोकमग्न ।।
आधुनिकतेच्या । स्पर्शात जगती
मात्र प्रशंसती । प्राचीनता ।।
अभिनंदनाचा । शब्द प्राप्त होता
घोर रडकथा । रंगविती ।।
कष्ट कसे केव्हा । माथी आले त्यांच्या
गोष्टी सा-या त्याच्या । ऐकविती ।।
दिसे कोणी जेव्हा । आनंदी नेहमी
"अधिक सुखी मी" । सांगतात ।।
किंवा "अशी संधी ... । ... नव्हती आम्हांस"
म्हणुनी उदास । होत जाती ।।
वेगळेपणाचा । संतत हव्यास
जोखीम तयांस । मात्र नको ।।
तर्कशुद्धतेच्या । आभासी जगती
मनी जोपासती । आशावाद ।।
निराधार आशा । डोळ्यांस झापडे
ह्यांत त्यां सापडे । समाधान ।।
पडता ही कोडी । प्रश्न माझा मीच
मनास माझ्याच । विचारला ।।
स्वबलावाचून । काय वेळी अशा
जगण्यास दिशा । पुरवी जे ।।
कृतीशील जो जो । मध्यमवर्गीय
तयापाशी काय । आशेविना ।।
स्वत:चे स्वत:च । जिणे अंतर्बाह्य
सदैव सुसह्य । करतात ।।
प्रार्थनेने माझ्या । मलाच स्फुरण
आशेचे तोरण । तसे मना ।।
कधी न सुटावी । अशी काही कोडी
राहू द्यावी थोडी । आयुष्यात ।।
- निलेश पंडित
१२ जुलै २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा