माहिती होते कुणाला रंगती ज्या धुंद राती
त्याच देती रंगुनी जगण्यास अंती मूठमाती
लंगडावे का अशांनी आणि त्यांना पोक यावे
दौडले जे नेहमी पूर्वी पुढे काढून छाती
लाभला प्रत्येक माझ्या पावलाशी नर्क काळा
वाटले होते मला मिळतील जेथे स्वर्ग साती
पाश सारे तोडले अन् वाटले मी मुक्त झालो
मुक्त होणा-या जिवांशी मात्र जुळली घट्ट नाती
कष्टले डोळे तसे मी त्यागले स्वप्नास माझ्या
आज कळते व्यर्थता अश्रू तरी येती नि जाती
पेटुनी आहेत झाल्या दिव्य तेजस्वी मशाली
लावल्या होत्यास तू ज्या काल छोट्याशाच वाती
- निलेश पंडित
१३ जुलै २०१५
त्याच देती रंगुनी जगण्यास अंती मूठमाती
लंगडावे का अशांनी आणि त्यांना पोक यावे
दौडले जे नेहमी पूर्वी पुढे काढून छाती
लाभला प्रत्येक माझ्या पावलाशी नर्क काळा
वाटले होते मला मिळतील जेथे स्वर्ग साती
पाश सारे तोडले अन् वाटले मी मुक्त झालो
मुक्त होणा-या जिवांशी मात्र जुळली घट्ट नाती
कष्टले डोळे तसे मी त्यागले स्वप्नास माझ्या
आज कळते व्यर्थता अश्रू तरी येती नि जाती
पेटुनी आहेत झाल्या दिव्य तेजस्वी मशाली
लावल्या होत्यास तू ज्या काल छोट्याशाच वाती
- निलेश पंडित
१३ जुलै २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा