(वृत्त: दासी)
तारा जुळतात कधी सूर कधी रंगतात
क्वचितच केव्हा परंतु पार ते दुरावतात
अवचित पायांना भिजविते लाट पुळणीवर
सरकताच वाळू पण जीव थरथरे क्षणभर
कृष्ण नील ताम्र श्वेत गूढतेत रम्य किती
उतरुनी डोळ्यांत खोल रंग जिवा भूलविती
पर्णांची शुष्कतेत सळसळ मज मोहवते
ज्यांत कधी सुप्तपणे सर्पजात वावरते
नाद रंग रूप गंध रस स्पर्शांच्या कवेत
टाहो दुर्गंधी नीरस छटा सवेच येत
जाणताच मात्र हेच गात्रे ऊर्जित होती
लाभतात जगण्याला क्षणोक्षणी दिव्य मिती
- निलेश पंडित
२८ जुलै २०१५
तारा जुळतात कधी सूर कधी रंगतात
क्वचितच केव्हा परंतु पार ते दुरावतात
अवचित पायांना भिजविते लाट पुळणीवर
सरकताच वाळू पण जीव थरथरे क्षणभर
कृष्ण नील ताम्र श्वेत गूढतेत रम्य किती
उतरुनी डोळ्यांत खोल रंग जिवा भूलविती
पर्णांची शुष्कतेत सळसळ मज मोहवते
ज्यांत कधी सुप्तपणे सर्पजात वावरते
नाद रंग रूप गंध रस स्पर्शांच्या कवेत
टाहो दुर्गंधी नीरस छटा सवेच येत
जाणताच मात्र हेच गात्रे ऊर्जित होती
लाभतात जगण्याला क्षणोक्षणी दिव्य मिती
- निलेश पंडित
२८ जुलै २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा