तेच वस्त्र अन् तोच पोतही
कुणी खेचते कुणी खोचते
कुणी सावरे ढळण्यापूर्वी
कुणी ढळू देऊन नाचते
पैठणीतला कुणी भरजरी
लखलखत्या दुनियेत मिरवते
डोईवरचा कुणी काढुनी
दो रुपड्यांस्तव पुढे पसरते
अनेक स्तर भेदून खालती
एकच दिसतो छुपा नेहमी
दबलेली हव्यासाखाली
आढळते गरजेची ऊर्मी
दिसतो ह्यांतच मनामनांचा
शरिराचा अन् शरीरतेचा
छटा वेगळ्या रंग परंतू
आज उषेचा उद्या निशेचा
- निलेश पंडित
१० आॅगस्ट २०१५
कुणी खेचते कुणी खोचते
कुणी सावरे ढळण्यापूर्वी
कुणी ढळू देऊन नाचते
पैठणीतला कुणी भरजरी
लखलखत्या दुनियेत मिरवते
डोईवरचा कुणी काढुनी
दो रुपड्यांस्तव पुढे पसरते
अनेक स्तर भेदून खालती
एकच दिसतो छुपा नेहमी
दबलेली हव्यासाखाली
आढळते गरजेची ऊर्मी
दिसतो ह्यांतच मनामनांचा
शरिराचा अन् शरीरतेचा
छटा वेगळ्या रंग परंतू
आज उषेचा उद्या निशेचा
- निलेश पंडित
१० आॅगस्ट २०१५
छानच ! शरीर हे आत्म्याचं वस्त्रच आहे तेव्हा या वस्त्रावरच्या वस्त्राची मीमांसा कवितेतून गडद झाली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद भारतीताई.
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा