हा ब्लॉग शोधा

शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

स्वातंत्र्य

(वृत्त: राधा)

ये करूया साजरा इतिहास स्वातंत्र्या
वर्तमानावर नको विश्वास स्वातंत्र्या

व्यर्थ आता क्रांतिवीरांच्या कथा साऱ्या
आज येथे लागतो आभास स्वातंत्र्या

इंग्रजांनी खंडग्रासाने कधी गिळले
आज भूमीला ग्रहण खग्रास स्वातंत्र्या

आजही कित्येक करती व्यर्थ बलिदाने
नित्य बकऱ्यांची इथे पैदास स्वातंत्र्या

फक्त श्रीमंतास लुटले का फिरंग्यांनी
ये जरा आपण लुटू गरिबास स्वातंत्र्या

विसर तो आता जुना उत्सव गणेशाचा
आज शिमग्याचा इथे उल्हास स्वातंत्र्या


- निलेश पंडित
१५ ऑगस्ट २०१५

२ टिप्पण्या: