हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

मार्ग



कुणाचा मार्ग चोखाळून जावे मी कुठे आता
धनुष्ये दिव्य ज्यांची त्याच थोरांचा रिता भाता

कुणाची कार्यक्षमता केवढी हे ताडणे सोपे
बघावे मित्र अथवा कोण कोणाचा पिता भ्राता

यशस्वी तो खरा जो लावतो लोकांस आशेला
पुढे काही जरी नाही दिले आशा वजा जाता

व्यवस्था भ्रष्ट तो करतो पुढे ती नष्टही करतो
स्वतःला काल जो म्हणवी व्यवस्थेचाच उद्गाता

कळेना रोज सारे हासरे मी चेहरे बघता
इथे मारेकरी कुठला नि आहे कोणता त्राता


- निलेश पंडित
२३ सप्टेंबर २०१५ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा