हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

नशा


नाद पावलास वेडा
चालते भलतीकडे
धुके दिसे दिशेत ज्या
तिला घालते साकडे

निरर्थकात शोधते
अर्थ हवा तो मनाला
मन भीतीचे कोंदण
मात्र जडवी पायाला

काटेकोर जग करी
भित्या मनाची चाकरी
समजावी, "मान सोने
शिळी मिळता भाकरी"

शिळ्या भाकरीचे सत्य
राही पाउल जाणून
नशेत सोने शोधते
दृष्टी धुक्यात ताणून

एक मार्ग एक दिशा
धुक्यातही एक दशा
पावलोपावली पुढे
उतरत जाते नशा


- निलेश पंडित
१ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा