हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

माती


जातो झिजून पुरता मी नांगरून माती
रुजता कुशीत मृत्यू जाते थिजून माती

चित्रात पाहतो मी हिरवी अथांग शेते
बाकी समीप दिसते दिसते दुरून माती

नियमीत पावसाचा इतिहास फक्त उरला
घामात रोज आता असते भिजून माती

मातीत जन्मलो मी मातीत वाढलोही
मग स्थान शेवटाचे गेली ठरून माती

असती निवांत निजले कोट्यावधी सुखाने
सामावुनी तयांना उरते अजून माती


- निलेश पंडित
४ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा