रोज आता फक्त मागे ओल माती
हाय ठरली आज मातीमोल माती
भडकती ज्वालाच आता शुष्क पोटी
क्रंदते 'खोदू नका रे खोल' माती
ना कुठे झाडे न गाणे पाखरांचे
नांदणे असले समजते फोल माती
माणसाच्या खोदण्याने कस हरवतो
सोसते वैराणतेचा बोल माती
रिचविते ती राखही अन् खाद्य देते
साधते सृष्टीतला समतोल माती
- निलेश पंडित
७ ऑक्टोबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा