हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

हातोटी

फुत्कार दंश ही सर्पाची हत्यारे
विष भिनता केवळ क्षणात जातो जीव
भीतीपोटी संरक्षण नकळत असले
जाणिवेत वसवी निसर्ग अल्प उणीव

मुंगूस खेळवी सापाला मृत्यूशी
हलकेच वेढते विषवल्ली वृक्षाला
पाशवी हिंस्त्रता भक्ष्य गिळंकृत करता
टोचती गिधाडे नंतर थंड शवाला

कोणास घडविते भूक कुणाला भीती
वर नैसर्गिक कौशल्ये शस्त्रे खास
वाचवी कातडी … जीव वाचवी कोणी
चुकता ते बनतो मात्र पशूचा घास

एकाच क्षेपणामधे मारणे कोटी
ही फक्त आपली नवनिर्मित हातोटी


- निलेश पंडित
१९ मार्च २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा