हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २४ मार्च, २०१६

वहिवाट

वहिवाट साधी नेमकी चोखाळतो तो नेहमी
चुकले तरीही आपले कुरवाळतो तो नेहमी

जेव्हा कधी लोकांस कोडे सुष्टदुष्टांचे पडे
पकडून कोणालातरी निर्दाळतो तो नेहमी

देशाभिमानाचा वसा कर्तव्य नाही मामुली
हे जाणतो अन् क्षण कृतीचा टाळतो तो नेहमी

परका कुणी कडवा जरा दिसताच रागाने जळे
प्राचीन धर्माला असा सांभाळतो तो नेहमी

सांगे गुरू धर्मामधे विज्ञान आहे गुंफले
ऐकून हे चवऱ्या गुरूवर ढाळतो तो नेहमी

- निलेश पंडित
२४ मार्च २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा