हा ब्लॉग शोधा

शनिवार, २५ जून, २०१६

मुक्त


दीन त्याचे दु:ख जावे हे म्हणे तो भक्त आहे
प्राण दीनांचा सहज घेण्यासही तो मुक्त आहे

घेउनी संन्यास तो अभ्यासतो वेदांत सारा
रोज कोणालातरी मग सांगण्या आसक्त आहे

ना ढळे संकल्प दृढ त्याचा अहिंसेचा कदापी
आग्रहास्तव मात्र शिष्यांच्या पितो ते रक्त आहे

मांडतो प्रस्ताव शांतीचे नि करतो योजनाही
विविध शस्त्रांनी तरी भांडार त्याचे युक्त आहे

रोज फिरती शिष्य महती गात त्याच्या दिव्यतेची
माणसांचे माणसासाठी असे हे सूक्त आहे

- निलेश पंडित
२५ जून २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा