आत सांगे विषमतेची कारणे कोणीतरी
शोधतो बाहेर आम्ही त्याच वेळी भाकरी
चेहरेही आमचे वैराण जमिनींसारखे
आणि दगडांवर कुणी ओते दुधाच्या घागरी
झेप आकाशात घेण्याचे इरादे थांबवू
फक्त आता मीच माझी ओळखावी पायरी
आमचे दारिद्रय म्हणजे फाटलेल्या गोधड्या
व्यर्थ त्यांना देशधर्माच्या निरर्थक झालरी
मिळवले स्वातंत्र्य पाशातून गोर्यांच्याच ना
पावले स्वातंत्र्यदेवीची तरी का पांढरी
- निलेश पंडित
१३ जानेवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा