हा ब्लॉग शोधा

शनिवार, २१ जानेवारी, २०१७

वारसा



सात पिढयांच्या हव्यासाला
पुरून उरेल
अशी जमवावी पुण्याई
ह्या हव्यासाने
स्वतःच्या अस्तित्वाच्या
कणाकणाचा
केला जिज्ञासेने वापर
दिवसातासांचे पापुद्रे सोलले
क्षणाक्षणांमध्ये

तेव्हा पदरात पडली वेदना
आयुष्याच्या उत्तरार्धात
प्रत्येक पापुद्र्यात ठणकणारी
सुजल्यामुळे कुजल्यामुळे
त्याहूनही अधिक थिजल्यामुळे
.... आणि उत्पन्न झाली
सूक्ष्मशी जाणीव

वारसा लाभावा
जिज्ञासेचा
नये लाभू
हव्यासाचा ...

ही जाणीवच ठेवावी म्हणतो आता
मागे
फक्त एका पुढच्या पिढीसाठी


- निलेश पंडित
२२ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा