हा ब्लॉग शोधा

रविवार, ८ जानेवारी, २०१७

आग


भाग नाही पाडले ज्याचे असा भूभाग नाही
आणि आता मूळ तिथल्या माणसांचा माग नाही

पेटली काही घरे अन् जीव काही नष्ट झाले
मात्र उरलेल्या मनांना आंच नाही जाग नाही

चळवळीला सज्ज येथे बिनविषारी साप सगळे
मात्र ज्याचा जीवघेणा डंख असला नाग नाही

सत्य करुणा आणि शांती आणि प्रज्ञा अन् अहिंसा
शब्द निव्वळ उधळण्यावर का कुणाचा राग नाही

पोखरे झाडास अख्ख्या वाळवी धीम्या गतीने
जाळण्याला झाड ते थोडी कुठेही आग नाही


- निलेश पंडित
८ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा