(वृत्त: धवलचंद्रिका)
का मनास भूल न सारखी पडावी
मृगजळात मती गुंग का न रहावी
... क्षणोक्षणी वास्तव का शुद्ध देतसे
शरीरता अगतिकता का न सरावी
पोत दुहेरी जगण्याचा असा कसा
घनतमास अकस्मात चिरे कवडसा
... प्रकाशही शाश्वत ना क्षणभंगुर तो
वस्तू बिंबासह संपतो आरसा
समजावे ब्रह्म तेच माया ठरते
मिथ्या म्हणतो ते नेमके उमजते
... सर्वशक्तिमान फिरे मागत भिक्षा
आकळते इतके ... काहीच न कळते
असो .... बोध हाच सुखावी मना जरा
आंदोलित मन हाही सुखाचा झरा
- निलेश पंडित
२४ जानेवारी २०१७
का मनास भूल न सारखी पडावी
मृगजळात मती गुंग का न रहावी
... क्षणोक्षणी वास्तव का शुद्ध देतसे
शरीरता अगतिकता का न सरावी
पोत दुहेरी जगण्याचा असा कसा
घनतमास अकस्मात चिरे कवडसा
... प्रकाशही शाश्वत ना क्षणभंगुर तो
वस्तू बिंबासह संपतो आरसा
समजावे ब्रह्म तेच माया ठरते
मिथ्या म्हणतो ते नेमके उमजते
... सर्वशक्तिमान फिरे मागत भिक्षा
आकळते इतके ... काहीच न कळते
असो .... बोध हाच सुखावी मना जरा
आंदोलित मन हाही सुखाचा झरा
- निलेश पंडित
२४ जानेवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा