हा ब्लॉग शोधा

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

हात

भारतापासून आम्हा दूर असते यायचे
भारताचे गोडवे राहून येथे गायचे

दूर देशी रक्त कोणी आटवावे नेहमी
स्वस्त उत्पादन इथे ते मस्त मी भोगायचे

जे मशीदींच्या निषेधांची गुऱ्हाळे लावती
हात त्यांनी मंदिरांसाठी इथे पसरायचे

शिक्षणापासून आता सर्व परदेशातले
मात्र माझा देश मोठा सारखे सांगायचे

वर्णद्वेषावर टिका पण जात पक्की पाळणे
दाखवावे एक असती दात दुसरे खायचे


- निलेश पंडित
१९ फेब्रुवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा