हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

निकष


स्वप्न आरामात जगण्याचे तिच्या डोळ्यात होते
सावजाची वाट बघणारे कुणी नशिबात होते

सर्व लोकांना मिळाली प्रस्तुतीची योग्य संधी
मात्र निवडीचे निकष संदिग्ध वा अज्ञात होते

दाद कोणाला अधिक हे मोजण्याचा निकष ठरला
दाद विकणारे बघेही आमच्या दारात होते

रंगली चर्चा तशी चर्चेत आली सर्व तत्वे
मग समजले कान पिळणाऱ्या बळीची मात होते

नगर दुमदुमले तसा जयघोष झाला गगनभेदी
मात्र कोणी त्याचवेळी आर्त गीते गात होते

- निलेश पंडित
९ फेब्रुवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा