हा ब्लॉग शोधा

शनिवार, २५ मार्च, २०१७

ओळी


कवितेत तिच्या असतात गहनशा ओळी
आक्रंदत गर्जत एखादी आरोळी
गर्भित अर्थाची अथांग अनंत व्याप्ती
पाण्याविण जैसी तडफडते मासोळी

तो पार वेगळा जरी साथ जन्माची
पैसे रुपयांतच सदैव तंद्री त्याची
तो शब्दसुरांनी निव्वळ अविचल राहे
जाणीव जणू चाकोरीतच जगण्याची

नजरेत तिच्या पण अतृप्तीचा पूर
नवनवे पुरुष लाविती तिला हुरहूर
विश्वास पूर्ण तो टाके तिजवर तेव्हा
तो शांत तृप्त ती चंचल नशेत चूर

कारण-फलिताचे कोष्टक विचित्र ठरते
मानवी चेहऱ्यामागे पशुता दडते


- निलेश पंडित
२५ मार्च २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा