हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

सोय


शोषितांचे गांजणे समजून घ्यावे लागते
आपल्या सोयीप्रमाणे वापरावे लागते

आग आटोक्यात आणावी त्वरेने नेहमी
फक्त आधी रान सारे पेटवावे लागते

वाममार्गाने मिळवणे खूप हा नाही गुन्हा
गवगवा करण्यास थोडे दान द्यावे लागते

जो खरा असतो शहाणा तोच संधी साधतो
वेड त्याला योग्य वेळी पांघरावे लागते

योग्य ठरते आपला इतिहास उज्ज्वल मांडणे
जे कधी घडले न तेही आठवावे लागते

राज्य आता पारध्याने फास लावावा तसे
गीत मुक्तीचे तरीही गात जावे लागते


- निलेश पंडित
१५ एप्रिल २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा