हा ब्लॉग शोधा

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

मार्ग

लाभला जो मार्ग तो चोखाळणे जमलेच नाही
मार्ग काही वेगळे धुंडाळणे जमलेच नाही

नेहमी जे जे मला होते हवे ते ते मिळाले
वाटणे जे ते हवेसे टाळणे जमलेच नाही

रोज आनंदात हसरा चेहरा मी जपत गेलो
मात्र आनंदात अश्रू ढाळणे जमलेच नाही

धार शब्दांना मिळाली आणि भाषा शस्त्र झाली
नम्रतेने मौन साधे पाळणे जमलेच नाही

दिवस आयुष्यातले खोट्या जणू हाराप्रमाणे
उमलणे जमलेच नाही वाळणे जमलेच नाही


- निलेश पंडित
१८ एप्रिल २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा