हा ब्लॉग शोधा

शनिवार, ६ मे, २०१७

न्याय

भिरभिरती नजरा
बुभुक्षित भयभीत
निसर्गाच्या पोटी स्फोट
अचानक विपरीत

हिंस्र कुणी उतावीळ
कुणी जीव अगतिक
एकास क्षणिक तृप्ती
दुजा डंख स्वाभाविक

अकस्मात होत जाता
भीती नि विकृती एक
ओंगळशा वैचित्र्याचा
घडे हीन अतिरेक

शहाण्यांच्या सुज्ञतेची
व्याख्या माजवी अनर्थ
विकलता ठरे त्याज्य
हिंस्र ठरती समर्थ

मृत्यू दोघांस अटळ
घात एका एका फास
शहाणेच वसविती
न्यायापोटी अन्यायास

सुजाणांच्या जाणिवेचे
कोडे पडते भकास
विकलता नि दुर्बुद्धी
कोण देते नि कुणास


- निलेश पंडित
७ मे २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा