हा ब्लॉग शोधा

शनिवार, २० मे, २०१७

रंग


रोज मोहवतो अचानक रंग सूर्यास्तातला
कोण आहे घालणारा साद आताशा मला

कालपावेतो उपेक्षा मिळवली भरपूर मी
काल जाता जीव आता लोक म्हणती चांगला

शेकडो सल्ले मिळाले ऐकले सारेच मी
राहिले मी ऐकणे आवाज माझा आतला

घाम दिवसा गाळला अन् कैक पोटे पोसली
पोट भरता का खटकलो मीच पण गुत्त्यातला

सूर्य जातो अस्तमानाला तसा झाकोळतो
वेळ थोडा लागला पण हे मला उमजायला

केस पिकले जीव थकला जसजसा आलो पुढे
काळ मागे निसटला तो आज समजू लागला

- निलेश पंडित
२० मे २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा